मी जसा नाही तसे मी व्हायचे होते कुठे?
चाललो आहे कुठे मी, जायचे होते कुठे?
वेगळी तू, वेगळा मी राहतो एका घरी
वेगळे याहून काही व्हायचे होते कुठे ?
वेगळे दोघे तरीही राहतो एका घरी
चांगले याहून काही व्हायचे होते कुठे?
एकट्याने मद्य घेण्याचा निघावा कायदा
मग मलाही कायदे मोडायचे होते कुठे?
या मनाच्या नूतनीकरणास जमली माणसे
माणसांना चांगले वागायचे होते कुठे?
मान्य होते ना तुला माझ्या गतीने जायचे
एकमेकांना असे ओढायचे होते कुठे?
का रडावे सांग भूषण पाहुनी मृत्यूस मी?
एकतर येथे मुळातच यायचे होते कुठे?