आयुष्य आता ईश्वराची घोडमल्ली वाटते
हे विश्व, हे अस्तित्व त्याची बगलबिल्ली वाटते
न्यायीपणे वागायची इच्छा तुला होईल का?
मीही तुझा, तूही तुझी, हे एककल्ली वाटते
आला जमाना कोणता? साऱ्या घरांना का तडे?
जातो तिथे आता मला माझीच गल्ली वाटते
'जे पाहिजे ते लाभले की पाहिजे काही नवे'
'हे थांबणे' हे जीवनाचे ध्येय हल्ली वाटते
'मी चंदनाचे झाड होणे, तोडणे माझे मला'
ही माणसांना कायद्याची पायमल्ली वाटते
केव्हा, कसा रुळलो न जाणे पोचल्यानंतर इथे
आता तसल्ली संपली याची तसल्ली वाटते