~~ प्रेमी युगुलाची गम्मत ~-(भाग-२)
..... लाट 'ऊंचावर' फुटे
'मामा' आज इकडे कुठे?
..... (भाग -१ च्या पुढे)
बंदोबस्तास आलो इथे
झुडुपा मागे तुम्ही तिथे
दिवस हल्लीचे बरे नव्हे
बॉंब, बंदुका खेळ नवे
लपता का झुडुपा मागे
सन्शयास्पद हे वाटे
माय बापास कळवतो
अद्दल चांगली घडवतो
नेत्र तिचे विस्फारले!
प्रसंग बाका मज उमगले
उगाच झालो का 'इंजिनीयर'
टाकला मग 'रिव्हर्स गीयर'
निरागस.. आम्ही बाळे!
कशास करू असले चाळे
मनच बंदुक आमची
उडवतो प्रेमाच्या गोळ्या
कशास भाजू आम्ही
अतिरेक्यांच्या पोळ्या!
आम्हा काय ठावुक
'आयटम बॉंब' अन 'गोळे'
अर्थ आम्हाला भासती
'वेगळे' यांचे थोडे
पुन्हा असे नाही होणार
रस्त्यान्वर नाही फिरणार
खरे प्रेम मम हिच्यावरी
सांगण्या आलो दूरवरी
'थोड्यानाच मिळते ही संधी!
आठवा आपले 'ते' दिवस
अन तारुण्याची 'ती' धुंदी!
विचारात 'मामा' पडले
पटलेसे थोडे दिसले
'कूच करावे माघारी'
'तंबी' मग त्यानी दिली
मुकाट परतता माघारी
पारा तिचा गगनावरी
म्हणता तिज हो 'ऐसपैस'
चुपचाप 'भावासम', तु बैस!
आठवता ते 'राष्ट्रपती'
अन पुण्यनगरीची ती वारी
हसून होते वाट पुरी
तिची नि माझी न्यारी!!!
~~~~~~~~