काव्य-प्रस्ताव : २

संदर्भ :  दुवा क्र. १

खाली दिलेल्या द्विपदीच्या अनुषंगाने - ही द्विपदी पूर्णतः/ अंशतः किंवा त्यातील केवळ कल्पना वापरूनही- आपल्याला

सुचेल / रुचेल त्या   कुठल्याही प्रकारातील रचना करावी आणि ह्याच धाग्यावर प्रतिसादाच्या रुपाने द्यावी.

आजची  द्विपदी   :

" शेवटी प्रश्न हा की इथे सोबती लाभले रे किती -
   एवढे भेटले, बोलले त्यांतले.. आपले रे किती ? "

इथे गालगा*६  हा  लगक्रम सांभाळायचा प्रयत्न आहे, पण ह्या वृत्ताचं  ( असं वृत्त असल्यास ) नाव माहित नाही- जाणकार
मार्गदर्शन करतीलच.

पहिल्या प्रस्तावाप्रमाणेच, मनोगतींना सहभागाची विनंती  आहे !