मार द्या शब्दांतुनी,.....सोटा नसावा
त्यात अपशब्दांचिया ...साठा नसावा
जाणले हे मर्म वस्त्रे फ़ाटताना
घेर पोटाचा कधी मोठा नसावा
वर मिळावा,मुंबई,नवी मुंबईचा
खारघर,पनवेल,कामोठा नसावा
काय वर्णावी अवस्था पामराची
पोट केले रिक्त,अन लोटा नसावा
लोक तिटकारा करा माझा परंतू
थेट व्हावे बोलणे,फ़ाटा नसावा
--डॉ.कैलास गायकवाड