ड्रुपल ११ आणि मनोगत

मनोगताला ड्रुपलच्या अकराव्या आवृत्तीवर नेताना अनेक अनपेक्षित तपशील पुढे येत आहेत. त्यामुळे हा बदल पायरीपायरीने पण सातत्याने करत राहण्याचे धोरण ठेवलेले आहे.

हे करीत असताना मध्येच काही चूक अकस्मात दिसून आली तर ती प्रशासनाला संपर्काद्वारे कळवता येईल.

"स्वतंत्र लेख न लिहिता हे निवेदन समासामध्ये एखाद्या चौकटीतही देता आले असते", असे वाटणे साहजिक आहे. तसे काही कारणाने न करता येणे हाही त्या अनपेक्षित तपशीलाचा भाग आहे.

कळावे.

धन्यवाद