गझल
चांदण्यांचे प्रेमही पाहून झाले
कोकिळांचे गीतही गाऊन झाले
प्राक्तनाला दान केले सर्व काही
आसवांचे बांधही वाहून झाले
हात हे उरलेत बाकी द्यायचे
घेतलेले सर्वही देऊन झाले
काळजाला कसे भिडले न गाणे?
सर्व साती सूरही लावून झाले
ऐन मोक्याला कसे फिरलात देवा?
सावलीचे झाड कैसे ऊन्ह झाले?
रे ऊन्हा हवेच आता काय तुजला?
मानसीचे फूल तेही जून झाले...
-------स्वप्निल