मुक्तक आणि गजल


मुक्तक -
कधी कधी मी असतो तेथे नसतो
कधी कधी मी मलाच शोधत बसतो
कधी कधी मी सापडतो मजलाही
कधी मला मी स्वतःच समजुन फसतो...


गजल -
जेव्हा दुःख लपवतो मी
तेव्हा उगीच हसतो मी...


आशेवरती जगतो मी
नवीन स्वप्ने बघतो मी...


वादळास मी सरावलो
सदैव सावध असतो मी...


कसा तुझ्यावर विसंबलो?
अजून आशा करतो मी...


बहाण्यात गायच्या 'गजल'
तुलाच ना गुणगुणतो मी...*


स्वप्न नवे अन जाग पुनः
पुनः कुशीवर वळतो मी...


ध्वस्त न झालो 'अजब' कधी
मनी वादळे जपतो मी...


[* ग़ज़ल बहाना करूं और गुनगुनाऊ उसे...  कतील शिफ़ाईच्या (बहुधा) मिसऱ्यावर आधारित]