काल २६ जुलै, म्हणजे कारगिल विजयाचा दिवस! बरोबर ७ वर्षांपूर्वी आपल्या जवानांनी 'ऑपरेशन विजय' यशस्वी करत पाकिस्तानी घुसखोरांना तडीपार केले.
२ मे ते १३ मे च्या दरम्यान पाकिस्तानाने आपले घूसखोर हिंदुस्थानी सीमेत घुसवले. हेतू हाच की नकाशा बदलायचा. मात्र वरकरणी आपला संबंध नसल्याचे दर्शवत पाकिस्तानाने आपले हात झटकले. प्रथम पाक ने त्यांच्या जवानांची प्रेतेही ताब्यात घेण्यास नकार दिला ज्यामुळे त्यांचा लष्करी सहभाग सिद्ध होऊ शकला असता. मात्र आपल्याकडे असंख्य सबळ पुरावे होते जे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड करत होते.
पाकिस्तानी दारुगोळा कारखान्यात बनलेले ७.६२ मिमि चे काडतूस
१५ ते २५ मे दरम्यान संपूर्ण योजना आखली गेली व 'ऑपरेशन विजय' साकारले गेले. २६ मे रोजी प्रत्युत्तरादाखल हल्ला सुरू झाला. ले. सौरभ कालिया चा भयानक हाल केलेला विद्रूप मृतदेह लष्कराच्या हाती लागला. माहिती काढण्यासाठी त्याला अनन्वित छळ करून ठार केले गेले होते. हा या युद्धातील परमवीर चक्राचा पहिला मानकरी.
मरू किंवा मारू या निश्चयाने उतरलेल्या भारतीय लष्कराने घुसखोरांना जबरदस्त दणका दिला. मात्र कुठल्याही यशाच्या भव्य इमारतीच्या पायात अनेक जणांचे बलिदान व त्याग असते. कारगिल येथे घुसलेल्या पाकिस्तान्यांना मारताना अनेक भारतीय जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. मात्र मरता मरता ते आपली कामगिरी करूनच मेले.
ले. कणाद भट्टाचार्य - मरणोत्तर सेना पदक (वय वर्षे २२)
आपल्या घरी आपण लढताना शहीद होण्यासाठी जात आहोत असे पत्र लिहून गेलेला कॅ. विजयंत थापर - तोलोलिंगचा मानकरी - मरणोत्तर वीरचक्र
ले. कैशिंग मंगरूम - महावीरचक्र
ले. बलवान सिंग - महावीरचक्र
ग्रेनेडिअर योगेंद्र सिंग - परमवीर चक्र
कॅप्टन साजू चेरिअन - सेना पदक
कॅप्टन जेरी प्रेमराज - वीरचक्र
कॅप्टन विक्रम बत्रा - परमवीर चक्र
रायफ़लमन संजयकुमार - परमवीर चक्र
मेजर सोनम वांगचूक - महावीरचक्र
मेजर पद्मपाणि आचार्य - महावीरचक्र
मेजर सरावणन वीरचक्र
या व अशा अनेक वीरांच्या बलिदानाने अखेर ऑपरेशन विजय यशस्वी झाले आणि घूसखोर व त्यांना घुसवणारी पाक सेना पार पराभूत झाली.
कारगिलच्या त्या महान वीरांना प्रणाम.
(हा लेख लिहिण्यासाठी साहित्य व पिच्छा पुरविल्याबद्दल तात्याचे मनःपूर्वक आभार)