काफिले..
हे सुगंधाचे निघाले काफिले,
आज मी हृदयात तुजला स्थापिले.
रुक्ष रस्ता आज ऐसा की पहा,
एकही ना झाड आता राहिले.
रोज तो सुंदर गुन्हा मज खुणवितो,
पण व्रताने हाय! मजला शापिले.
पाहुनी माझी भरारी आजची,
तु नव्याने पंख माझे कापिले.
होऊनी मी माळ फेसाची सदा,
ह्या किनाऱ्यासी स्वत:ला वाहिले.
-मानस६