चिवडा

 

 

वाढणी : ५-६ लोकांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ : १५ मिनीटे

साहित्य:
१/२ किलो पातळ पोहे कुरमुरे
२ मुठी शेंगदाणे
१०-१२ काजू बी
८-१० मिरच्या
१०-१२ कढीपत्ता पाने
१/२ वाटी तेल
हिंग, हळद, मोहोरी, जीरे मीठ, साखर

कृती :
१) पातेल्यात तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, काजू थोडे तळून
घ्यावे. नंतर त्यात मोहोरी, जीरे, हळद, मिरची आणि कढीपत्ता घालून
फोडणी करावी. त्यात पोहे आणि कुरमुरे घालावे आणि सर्व पोह्यांना तेल
लागेल असे मिक्स करावे. हे करताना गॅस बारीक ठेवावा.
२) गॅस बंद करून चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालावी.

टीप:
१) आवडीनुसार चिवड्यात मनुका, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, डाळं घालता येते.
२) फोडणी करताना लसणीच्या पाकळ्या कापून घातल्यास चिवड्याला लसणीचा छान स्वाद येतो.

चकली

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.