वाढणी: ५,६ जणांना भरपूर
पाककृतीला लागणारा वेळ: १२० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस:
- १२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १
चमचा
- १.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध
- २ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर
- ३ ,४ मध्यम आकाराची सफरचंदे
क्रमवार मार्गदर्शन:
१. बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.१ चिमूट मीठ,लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.मैदा थोडा थोडा घालत फेटणे. शेवटी दूध घालून फेटणे.
२. सफरचंदाच्या साली काढून फोडी करणे (खाण्यासाठी फोडी करतो तशा) व त्या फोडींमध्ये सुरीने खाचा मारणे. ३. ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे.त्यावर सफरचंदाच्या फोडी उभ्या लावणे.खाचा मारलेला भाग वर आणि निमुळता भाग मिश्रणात थोडा बुडेल अशा सर्व फोडी गोलाकार लावणे. |
![]() |
बेक करण्याआधी |
४. अवन प्री हिट करणे.१८० अंश से. वर ४५ मिनिटे बेक करणे. बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभीत करणे. |
![]() |
बेक केल्यानंतर |
माहितीचा स्रोत:
अर्थातच त्सेंटा आजी !
अधिक टीपा:
सफरचंदाऐवजी अननस किवा चेरी घालून ही हा केक उत्तम लागतो, (हे माझे पाक-प्रयोग!)
स्वाती दिनेश