फिश कटलेट

 

वाढणी:
४ जणांसाठी


पाककृतीला लागणारा वेळ:

६० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

 

  •  सुरमई - १/४ किलो
  • अंडं- १ 
  • पावाचे स्लाईस - २ 
  • ब्रेडचा चुरा 
  • आलं - १ इंच 
  • लसूण - ६-७ पाकळ्या 
  • हिरवी मिरची - २- ३ नग 
  • कोथिंबीर- अर्धी वाटी 
  • लिंबू - अर्धे 
  • मीठ - चवीनुसार 
  • तेल - तळण्यासाठी

क्रमवार मार्गदर्शन:

सुरमईतील काटे आणि त्वचा काढून टाका.
सुरमईचा खिमा करून घ्या. मिक्सरमधून फिरवून घेतल्यासही चालेल. नुसत्या सुरीनेही
बारीक खिमा होतो.
आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटून वरील खिम्यात मिसळा.
पावाचे स्लाइस थोडावेळ पाण्यात भिजत ठेवून नंतर त्यांच्या कडा काढून टाका आणि
दोन्ही हातात घट्ट दाबून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. हा पावाचा लगदा आता
सुरमईत मिसळा.
एका अंड्याचा पांढरा भाग (फक्त) आणि  अर्धे लिंबू पिळून वरील मिश्रणात टाका.
चवीनुसार मीठ टाका.  त्यातच १ ते १-१/२ टेबलस्पून ब्रेडचा चुरा मिसळा. हे सर्व
मिश्रण एकजीव करून त्याचे, लिंबापेक्षा किंचित मोठे, ८ गोळे करा.
हे गोळे तळहातावर दाबून चपटे करा. एका ताटलीत ब्रेडचा चुरा पसरून त्यात
प्रत्येक कटलेट घोळवून बाजूला ठेवा.
तेल मंद आंचेवर तापवून एकावेळी २-३ कटलेट ह्याप्रमाणे सर्व कटलेट तळून घ्या.

टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या.

शुभेच्छा....!

प्रभाकर पेठकर

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.