वाढणी: ४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:
डाळ भिजवायला ५-६ तास
वडे बनवायला अर्धा तास
पाककृतीचे जिन्नस
- १ कप चणा डाळ
- १ मध्यम कांदा
- २ मोठ्या हिरव्या मिरच्या
- १/२ इंच आलं
- कढीपत्ता ४-५ पाने
- जिरं
- कोथिंबीर
- तेल
- मीठ
|
 |
क्रमवार मार्गदर्शन:
चणाडाळ धुवून ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवावी. नंतर ती पाट्यावर किंवा फूडप्रोसेसरमध्ये पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी. कांदा, मीरची, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. जिरं गरम तव्यावर परतून खलबत्त्यातून कुटून घ्यावे. हे सर्व जिन्नस एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालावे. कढईत तेल गरम करावे. भजीचे मिश्रण हातावर घेऊन त्याचे चपटे गोळे करावेत आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावेत. टोमॅटो केच-अप किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत वाढावेत.
माहितीचा स्रोत:
आमचे दाक्षिणात्य नातेवाईक
अधिक टीपा:
डाळ मिक्सरमध्ये वाटू नये कारण पाणी घालावे लागते आणि कृती बिघडते.
प्रियाली