शताक्षरी शब्दकोडे (१)

शताक्षरी १

  1. आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  2. शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  3. छापून घेऊन फावल्या वेळात सोडवा!








१०

११ १२
१३ १४ १५

१६
१७



१८



१९
२०

२१
२२

२३


२४
२५


२६ २७
२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५
३६
३७ ३८
३९
४०




४१

आडवे शब्द उभे शब्द
  1. नसे हा कधी चारचौघांप्रमाणे ।
    जगी मानिती त्याजला ह्याप्रमाणे ? ॥ (४)
  2. थोडा राग आला तरी ठार करू (२)
  3. असल्यांमध्ये ताकभात म्हणणे म्हणजे गोंगाटच (४)
  4. टपाल चिरु कुस्करु तेच तेच चावून कंटाळा आला तर हे करणारच (५)
  5. मालक झोपतील आंतमध्ये (२)
  6. साका जमेस धरू नकोस (२)
  7. विनोद आवडलेली आनंदी (५)
  8. असे पक्के ठरवायचे आणि गडबडून म्हणायचे मारा कर ना (५)
  9. बाहेर नसणारे बंगाली अन्न पचविण्याचा एक अवयव (३)
  10. गावा जा गोंधळ घाल शेवटी आटप निवडणुकीसाठी हे करच (५)
  11. पोलीस कार्यालय की प्रेते फाडण्याची जागा? (५)
  12. वर्गवारीकडे (२)
  13. लेखणी सोडून दे (२)
  14. माणसाच्या जीवनात माश्याचा जीवनक्रम कसा कळणार? (२,२,२,२,२)
  15. प्रमाणापेक्षा जास्त अभावाने तो मुलाच्या मुलीला शेजारी बसवे (४)
  16. अस्वच्छ वस्त्या स्वच्छ करण्यात रस घेणारा एक प्राणी (३)
  17. दुःखी अंतःकरणाने जन्माला घालण्यात केस रंगवणे (५)
  18. शेवटचे अक्षर लिहिण्याआधीच निर्धार झाला तर काही कमी पडायला नको (३)
  19. मुख्य विषयाआधीचे ओळखपर भाषण अगर लेखन (४)
  20. होकारात्मक मान हाललेली दिसली की ही मिळाली समजावे (३)
  21. चंद्रवनातून वाहणारा पदार्थ (२)
  22. जरा गोंधळाया प्रती भार सार ।
    नि आकाशवाणी परी हो प्रकार ॥ (३,३)
  23. ओठात पकड (२)
  1. जितके हवे तेव्हढेच दूध मोजताना इथे असते (३)
  2. बोरू पकडण्यातला एक अलंकार (३)
  3. इतके संतापणे भिकेला लावते म्हणतात (२,२)
  4. पायथ्याशी ठोकलेले तंबू (२)
  5. बगलेत खुपसला तर पाराच चढेल (५)
  6. बाजारात मिळणारे एक पेय (२,३)
  7. गावात रमणारी शीतलता (३)
  8. हे आले की सोळावे सरले म्हणून समजावे (४)
  9. इतक्या लाजर्‍या की देशीच (४)
  10. आकाशाला शिडी लावली तर संपत्तीचे भांडार गवसेल (३)
  11. पुष्कळ सराव करून लोकांपुढे सोंग आणणे (३,३)
  12. पत्त्यांच्या डावातील सर्व एक्के राजे राण्या गुलाम दश्श्या नश्श्या अठ्ठया छक्क्या पंज्या चव्व्या तिर्‍या दुर्‍या शिल्लक ठेवल्या तर त्या डावाचा हा होईल (४)
  13. नगरसेवकांना जमला हो कारभार जर का
    कशास मोठा गोंधळ सावरण्या तो येइ फुका? (४)
  14. एकवचन द्विवचन बहुवचन असा निसर्गक्रम (५)
  15. वडिलांच्या हातात पेन मुलाच्या हातात बॅट (५)
  16. निम्मा उपग्रह काढून टाकण्यासाठी हा देतात (४)
  17. त्याप्रमाणे उलटलेला आकडा (२)
  18. अर्धवट मल्लाला बाण लागला तर तो काठ गाठील (४)
  19. तिला जाण्याचा आग्रह करणारा निद्रानाश (२)
  20. पतीस कुंकू लावून घोळात घेऊन मान्यता मिळवावी (३)
  21. नाट्यसमीक्षकाच्या नांवातील (चंद्र?) प्रकाश (२)
  22. मधला मधला गोड पदार्थ (२)


विनंती : हे शब्दकोडे पूर्वी जालावर (सदस्याच्या संकेतस्थळावर, १९९९ मध्ये) प्रसिद्ध झालेले होते. कोडी, समस्यापूर्ती, कूटप्रश्न ह्यासारख्या लेखनासाठी / प्रतिसादांसाठी सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने ते येथे सादर केलेले आहे. तांत्रिक अडचणी, सापडलेल्या चुका आणि कोड्याची उत्तरे सर्व येथेच प्रतिसादांद्वारे द्यावीत. त्यासाठी कृपया व्य. नि. पाठवू नयेत. (सर्व प्रतिसाद काही काळापर्यंत झाकलेले राहतील अशी सुविधा घडवण्याचा बेत आहे.) : प्रशासक