प्रतिभा पाटील ??

नमस्कार!

माफ़ करा..पण देशाच्या होऊ घातलेल्या (भावी) राष्ट्रपतिंबद्दल मला काहीही माहिती नाही हो...

या प्रतिभा पाटील कोण आहेत, राजस्थानच्या 'राज्यपाल' याशिवाय त्यांचे क़्वालिफ़िकेशन (माफ़ करा, प्रतिशब्द माहित नाही) काय? त्यांचे कार्य काय? की फ़क्त 'स्त्री' हेच मुख्य क्वालिफ़िकेशन?? शिवसेनेचा कलाम ना का पाठिंबा नाही/नसावा ते कारण पटण्यासारखे आहे...आणि योग्यही आहे. पण या सगळ्याचा फ़ायदा प्रतिभा पाटील-शेखावत यांना मिळावा? मराठी आणि स्त्री व्यक्ती म्हणून काणाडोळा करणे कितपत योग्य आहे?

कलामांची तर ग़ोष्टच न्यारी! कलाम सुरुवातीला म्हणतात की आता त्यांना राष्ट्रपति होण्यात रस नाही...आणि दोनच दिवसांनी गुगली टाकतात - " होईन, पण पाठिंब्याची खात्री देत असाल, तरच!" - हे काय चालु आहे? अफ़झल गुरु ला अजुन शिक्षा झाली का नाही?

राष्ट्रपतिपद असावेच का? राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवताना ऊमेदवारांनी जनतेला काही आश्वासने (अजेंडा) देणे का गरजेचे नसते? महाराष्ट्राने आणि मराठी जनतेने प्रतिभा पाटलांकडून काही अपेक्षा ठेवाव्यात का?

तुमचे काही विचार...?