उ. झाकिर हुसेन ह्यांचे मराठी

बृहन्महाराष्ट्रमंडळाच्या अमेरिकेतल्या कार्यक्रमात उ. झाकिर हुसेन मराठीत बोलले अशी वार्ता मटा. मध्ये वाचायला मिळाली आणि गंमत वाटली. ह्यावर विचारांची देवाण घेवाण करता यावी म्हणून ती बातमी येथे उतरवून ठेवीत आहे.

म.टा.तली बातमी : उस्तादांची मराठीत 'उस्तादी' 
सोमवार २ जुलै २००७.

सिऍटल

मी मुंबईचा विशेष करून महाराष्ट्राचा असल्याचा मला अभिमान वाटतो, असे ओघवत्या मराठी मनोगत व्यक्त करीत जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांनी बीएमएमच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांचे मने जिंकली. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या १३व्या कन्वेंशनच्या दुसऱ्या दिवशी उस्ताद जाकीर हुसेन यांच्या तबलावादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी जाकीर हुसेन यांचा आवर्जुन इंग्रजीत परिचय करून दिला, मात्र, महाराष्ट्राचे मराठीत आभार मानून जाकीर हुसेन यांनी उपस्थित मराठी मनांना अचंबित केले. त्यांनी केवळ मराठीत आभार मानले नाही तर कार्यक्रमाचे स्वरूप मराठीतच सांगितले.

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आपल्या बहारदार तबलावादनाने नेहमीप्रमाणे उस्तादजी श्रोत्यांना 'वाह उस्ताद वाह' अशी दाद देण्यास भाग पाडले.


१. सिऍटल मधले हे संमेलन तुम्ही पाहिले का?

२. परिचय इंग्रजीत करून देऊनही उस्तादसाहेब मराठीत का बोलले असतील असे तुम्हाला वाटते?

३. उस्तादांनी कार्यक्रमाचे स्वरूपही मराठीत का सांगितले असावे?

४. ते मराठीत बोलल्यावर त्यांच्या बोलण्याचे इंग्रजी भाषांतर करून ते ऐकवले का?

५. मराठी मने मराठी ऐकून अचंबित झाली की उस्तादसाहेब मराठीत बोलले म्हणून अचंबित झाली, असे तुम्हाला वाटते?

६. बाकी कार्यक्रमांचे परिचय आणि निमंत्रितांची अशी भाषणे मराठीत झाली की इंग्रजीत?

अवांतर : मागे (माजी राष्ट्रपती) शंकर दयाळ शर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल असताना पुण्यात आले होते. तेव्हा त्यांचा परिचय आणि इतर भाषणे वक्त्यांनी आपापल्या हिंदीतून केली होती. श्री. शंकर दयाळ शर्मा मात्र मराठीतून बोलले!