''सर्प्राईझ केले'' म्हणजे काय होते?

अनेक सुशिक्षित घरातील माणसे कधी कधी गम्मत म्हणून संबधिताला न सांगता,त्याचेसाठी काही भेट वस्तू आणतात.त्याव्यक्तीकडे ती वस्तू आधीच असते.त्यामुळे भेट मिळाल्याचा आनंद त्या व्यक्तीला मिळू शकत नाही.काही वेळेला मुद्दाम न विचारता ,एखादी वस्तू आणतात,आणि मी सरप्राइज केले असे सांगतात.यामुळे वस्तू सगळ्यांच्या उपयोगाची असली तरी ती घरात आल्याचा आनंद सर्वाना मनापासून होऊ शकत नाही्. हे लक्षात घेऊन  घरात नवीन वस्तू आणण्यापूर्वी ,घरातील मोठ्या स्त्री-पुरुष माणसांशी चर्चा करावी.त्यामुळे जास्तीत-जास्त गरजेची वस्तू घरात येउन,सर्वाना आनंद होउ शकतो.तसेच आपलेही मत विचारात घेतल्याचा आनंद प्रत्येकाला मिळू शकतो.यात ही पैसे न मिळवणाऱ्या आई,सेवा-निवृत्त झालेल्या वडिल,आजोबांना खूप समाधान लाभते .असे करणाऱ्याबद्दल सर्वांच्याच मनांत प्रेम वाढीस लागते.

पण असे अनेक घरातील माणसे करत नाहीत.त्यांचेही काही म्हणणे ,असेलच.मग ते सांगायची पाळी  आता तुमचीच !