वहातुकीचे नियम का पाळावेत?

मी मुळचा पुण्याचा.

पण सध्या नोकरी निमित्त जोहान्सबर्ग, दक्षिण आफ़्रिका.

इथे मला भावली ती म्हणजे वहातुकीचे नियम पाळणारी माणसे.

अगदी रात्री १ वा. सुद्धा.

कुठेही हवालदार नाही.कुठल्याही गल्ली मधुन कोणी एकदम रस्त्यावर येत नाही.

त्यामुळे कुणालाच कसला त्रास नाही.

कर्कश्श हॉर्न नाहीत. रस्त्यावर वाद-विवाद स्पर्धा नाहीत.

आणि शक्यतो कोणी हॉर्न वाजवत नाही.

इथे वहातुकीचे नियम मोडले की लोकाना अपराधी वाटते.

पुण्यात असे होईल?