पिळवणूक

माझ्या मित्राने नाइट कॉलेजमध्ये शिक्षण करताना १२वी पर्यंत आयटीआय शिक्षण पूर्णं केलं.वाणिज्य शाखेत पदवी मिळवल्या नंतर डिप्लोमा पूर्ण केला.एवढ्या मेहनतीने मिळवलेले शिक्षण एका कंपनीच्या अटीनुसार ओरिजनल सर्टिफिकेट ३ महिन्यासाठी त्या कंपनीमध्ये जमा केले.पण आता ६ महिने होत आले तरी ते सर्टिफिकेट देण्यास टाळाटाळ करत आहेत.जास्त दिवस रात्रवेळेत काम करण्यास भाग पाडत आहेत.सुरवातीला काम करताना सर्वांनाच जास्त कष्ट करावे लागतात मेहनत करावी लागते पण हि पिळवणूक होत आहे.या गोष्टी हक्काने मागितल्या तर काम केल्याच सर्टिफिकेट मिळेल की नाही हा प्रश्न.

मी मनोगतीला विचारू इच्छितो यावर काही उपाय आहे का? कायद्यानुसार कुठल्या कंपनीला अश्याप्रकारे सर्टिफिकेट ठेवता येतात का?