राज्य परिवहन : शुभास्ते पंथानः

एकाच दिवशी मुद्दाम उल्लेख कराव्याश्या एकाहून अधिक बातम्या वाचायला मिळण्याचे दिवस दुर्मिळ असतात त्यातलाच आजचा एक असावा.

आज ईसकाळात राज्यपरिवहन मंडळाची ही बातमी वाचायला मिळाली आणि आनंद झाला. सर्वांना माहिती व्हावी आणि विचारांची देवाणघेवाण करणे सुलभ जावे ह्या हेतूने ती येथे उतरवून ठेवली आहे.

ईसकाळातली मूळ बातमी : नागरिकांना आता एसटीची घरबसल्या तिकिटे

पिंपरी, ता. ७ - राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या नवीन संकेतस्थळामुळे नागरिकांना आता घरबसल्या प्रवासाची तिकिटे उपलब्ध होणार आहेत. महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांच्या हस्ते आज या संकेतस्थळाचे उद्‌घाटन करण्यात आले.
एस.टी. चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता, विभागीय वाहतूक अधिकारी संजय सुपेकर, प्रशिक्षण केंद्राचे उपमहाव्यवस्थापक रवींद्र कदम या वेळी उपस्थित होते. http://msrtc.maharashtra.gov.in असा संकेतस्थळाचा पत्ता आहे.

या वेळी बोलताना श्री. परिचारक म्हणाले, ""महामंडळाचे हे साठावे वर्ष आहे. [float=font:dhruvB;color:EEDEAA;background:FE495A;place:top;]जगाबरोबर जाण्यासाठी कार्यपद्धतीत बदल आवश्यक असून, त्यासाठीच संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी या संकेतस्थळाचा उपयोग करून अधिकाधिक प्रवास एसटी ने करावा.[/float] प्रवाशांशिवाय एसटीचे उत्पन्न वाढणार नाही. त्यांच्या सेवेसाठी एसटीने विविध प्रकारच्या बस सुरू केल्या आहेत.''

श्री. गुप्ता यांनी संकेतस्थळाची माहिती दिली. ते म्हणाले, ""संकेतस्थळामध्ये महामंडळातर्फे पुरवल्या जाणाऱ्या एशियाड, शिवनेरी, महाबस अशा विविध प्रवासी सेवांची माहिती, प्रमुख बसस्थानकांवरील वेळापत्रक, संगणकीकृत आरक्षण केंद्रे, प्रवासाभिमुख योजना, प्रवासी भाड्यात सवलत, आरक्षित तिकिटांचा परतावा आदींबाबतची माहिती व कार्यपद्धतीचा अंतर्भाव असलेली "नागरी सनद' समाविष्ट करण्यात आली आहे.''

माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती अधिकाऱ्यांची पदनामे व दूरध्वनी क्रमांक या माहितीचाही पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. संकेतस्थळामध्ये आरक्षणाबाबतची माहिती येत्या वर्षभरात उपलब्ध करून दिली जाणार आहे; तसेच टप्प्याटप्प्याने एसटीचे ८४ हजार मार्ग आणि १५ हजार ५०० फेऱ्यांची माहिती समाविष्ट केली जाणार आहे. प्रवाशांकडून येणाऱ्या सूचनांचा विचार करून संकेतस्थळावरील माहितीत सुधारणा केली जाणार आहे. भविष्यकाळात एसटीचे वेळापत्रक मोबाईलवर "एसएमएस'द्वारे उपलब्ध करून देण्याची योजना आहे, असेही त्यांनी सांगितले.


ही बातमी महाराष्ट्राचे पानावर किंवा मुख्य पानावर न येता पुण्याच्या पानावर येण्याचे कारण काय असावे?

रा.प.म. च्या संकेतस्थळाचा तुम्ही अनुभव घेतला आहे का?

आता घरबसल्या तिकिटे मिळणार असल्याने त्याचा रापम वर , नागरिकांवर आणि इतर खासगी वाहतुक व्यवस्थेवर काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते?