५२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

                अशोक विजयादश्मी आनी ५२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा!

आज ५२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन दिवशी सर्व बंधू आणि भगिनींना  माझ्या हार्दिक शुभेच्छा !

 सम्राट अशोकाने विजयादशमीच्या बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साठी आपले जीवन समर्पित केले. १४ अक्टूबर १९५६ नागपुर च्या पवित्र दीक्षाभूमिला आपल्या लाखो अनुयायी सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची  दीक्षा घेतली. म्हणून या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त झाले आहे. किती पावन  दिवस तो आणि किती पावन ती भूमी, दीक्षाभूमी ! 

 आजही देशाच्या काना कोपरयाहून जय भीम बोलो और दीक्षाभूमी चलो चे  नारे लावत   भिम जनसमुदाय दीक्षाभूमिला येतात. जयभीम आणि बाबासाहब अमर रहे च्या जयघोषानी सर्व परिसर दुमदुमून जातो. जिकडे तिकडे सभा, भीमस्तुतीचे भजन आणि बुद्ध वंदना तसेच बुद्धे भीम गीते ने पूर्ण परिसर पवित्र होऊन जातो.स्तुपाच्या दर्शनासाठी जनतेची खुप लांब रांग असते तरी बाबासाहेब यांचा जयजयकार करीत आणि बुद्ध वंदनेचा उच्चार करीत स्तुपाचे दर्शन घेतात आणि त्या महामानवास म्हणतात की भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना!
पञ्चशिलाचे पठन करतात आणि म्हणतात तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगा वरी .
बुद्धं शरणम गच्छामी!
धम्मम शरणम गच्छामी!
संघम  शरणम गच्छामी!

पञ्चशील या प्रकारे आहेत :
१) मी जीवहींसे पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
२) मी चोरी करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
३) मी कामवासना आणि व्यभिचारा पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
४) मी खोट बोलणे आणि निंदा नालस्ती करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
५) मी मद्य आणि इतर मादक पदार्थांच्यासेवना पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.

चला मित्रानो या पञ्चशिलाचे पालन करून आपले जीवन सुखी, समृद्ध आणि शांतिने व्यतीत करू या.
बोधीसत्व महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन!
जय भीम!
जय भारत!