पहारे

होते किती पहारे
पण पोचले इशारे!

ना आज भेट झाली
हे कालचे शहारे!

तो दंश प्रिय होता
मी टाळले उतारे!

ते स्पर्श, चांदण्याच्या
वर्खातले निखारे!

काया मयूर झाली
प्राणा नवे पिसारे

दोघातले गुन्हे, अन्
दोषी ऋतू बिचारे!

(जयन्ता५२)