'क्या बात है...' ला पर्याय काय?

सारेगमप लिटल चॅंपस ह्या कार्यक्रमात चांगल्या गाण्याला दाद देताना सर्व परीक्षक (जेष्ठ सुद्धा) "क्या बात है.. " अशी हिंदीमधून दाद देतात असे लक्षात आले.

आता मराठी मध्ये क्या बात है ला समांतर वाक् प्रचार काय असू शकतो हा विचार मी गेले बरेच दिवस करतो आहे. शेवटी सुचले नाही म्हणून म्हटल मनोगतींची मदत घ्यावी. 

तेव्हा मनोगतींनी कृपया मराठीतून दाद देण्यासाठी योग्य असे पर्याय सुचवावेत. म्हणजे एक भुंगा कमी होईल.   

(ह्याबाबत पूर्वीच मनोगतावर चर्चा झाली असल्यास कृपया दुवा द्यावा. )