एक चीड निर्माण करणारी गोष्ट सांगत आहे.
आमच्या कंपनीतील एकाला आमच्या साहेबांनी काही ऑफिशियल कारणासाठी बेंगलोरला जायला सांगीतले होते.
त्याला विशिष्ट तारखेचे तिकीट न मिळाल्यामुळे प्लॅन चार दिवसांनी लांबला.
त्याचा मला फोन आला की चार दिवसांनतर त्याला जाणे शक्य नाही कारण काही घरगुती स्वरुपाचा कार्यक्रम आहे.
मी "बर" असे म्हंटल्यावर संवाद खालीलप्रमाणे झालाः
तो - मला तेव्हा जाणे जमणार नाही कारण घरी एक कार्यक्रम आहे.
मी - बर
तो - कारण काय झालंय.... नेमका माझ्या घरी त्याच दिवशी कार्यक्रम आहे
मी - ठीक आहे, ठीक आहे!
तो - हां! तेच तुम्हाला सांगावे म्हणालो, की नेमका त्याच दिवशी तो कार्यक्रम असल्यामुळे मला जाणे शक्य नाही.
मी - ओके
तो - हां! कारण तिकीट मिळतंय, पण ...
मी - अहो ठीक आहे, नंतर पाहुयात.
तो - तेच म्हंटलो, कारण काय झालंय....
मी - तुमच्याकडचा कार्यक्रम झाल्यानंतरचा दिवस पाहू एखादा!
तो - हां! कारण जायला तसा काही प्रॉब्लेम नाही, पण
( इथे मात्र मी सटकलो व जे बोललो ते इथे अपेक्षित आहे त्या भाषेत लिहिणे शक्य नाही. )
चर्चेचा प्रस्ताव हाः
लोकांना हे का समजत नाही की संवादामध्ये प्रत्येक वाक्यागणिक पुढे जायचे असते. ते तेच तेच का बोलतात? हा बुद्धिचा भाग म्हणावा की काय म्हणावे?