रगड

मराठीतील पहिले विडंबक-द्वय, खो-के, सहर्ष सादर करीत आहे मराठी जालविश्वातील पहिले द्वंद्व-विडंबन ( की युगुल-विडंबन? ) - 'रगड'

मूळ जमीन : श्री. भूषण कटककरांची गझल दगड

पान या कादंबरीचे फाडुया
आपलेही ताव तिजला जोडुया

या विडंबन आज याचे पाडुया
आज थोडी खोड याची काढुया

घ्यायचा आहेच येथे फ्लॅ्ट तर
काय होते लोनचे ते पाहुया

दाद देण्यासारखे काही लिहो
आज ह्याने काय लिहिले पाहुया

वेळ झाली नेहमीची आपली
या, घसा ओला करूया, खाउया

कोण जाणे का असा लिहितो रगड
तोडतो तारे किती ते मोजुया

केस ती सोडेल तेव्हा सोडु दे
शेपटा तूर्तास आपण ओढुया

हेच ते जे चित्र पुर्वी बिघडले
आज मॉडर्न आर्ट त्या संबोधुया

केव्हढी घाई तुला खोक्या तरी?
आतला बाहेर येता जाउया!