विडंबने-६ प्रश्नोत्तरे

विडंबने-६ प्रश्नोत्तरे

विडंबने-६ ह्या कविता सदरात प्रकाशित केलेल्या नोंदीवर आधारित प्रश्नोत्तरे आणि चर्चा इथे व्हावी अशी अपेक्षा आहे.

कालावधीः लागेल तेवढा

प्रश्न-१ विडंबन म्हणजे काय?
        अ. मूळ कवितेच्या आकृतीबंधाची, लकबीची, चर्चाविषयाची नक्कल
        ब. मूळ कवितेच्या गुण वा अवगुणांचा वापर करून
            आसमंतातील विसंगतींची उडविलेली खिल्ली
        क. मूळ कवितेशी साधर्म्य सुचविणारी,
             आसमंतावर भाष्य करणारी नवीन विनोदी कविता
        ड.   मूळ कवितेशी आकृतीबंधाव्यतिरिक्त कसलाच संबंध नसलेली
             नवीन विनोदी कविता
        इ.   उत्तर वरीलपैकी एकही नाही.
             (मग काय आहे ते वेगळ्याने सविस्तर लिहावे. )

प्रश्न-२ या विडंबनात खोडसाळपंतांनी कशाचे विडंबन केलेले आहे?
        अ.  मूळ कवितेतील वर्णनशैलीचे
        ब.  मूळ कवितेतील विषया वा आशयाव्यतिरिक्त इतर कशाचे
        क.  कवितेच्या आकृतीबंधाचे
        ड. वरील पैकी कुठलेही नाही.
            (मग कशाचे ते वेगळ्याने सविस्तर लिहावे. )

प्रश्न-३ विडंबन आकाराने मूळ कवितेइतकेच असणे आवश्यक आहे का?