पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी

पुण्याचा वाहतूक व्यवस्थेविषयी बरेच बोलले-लिहिले जात आहे. या संदर्भात शासनावर अबलंबून राहून काहीतरी बरे होईल या आशेतला फोलपणा आता ध्यानात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी एकत्र येऊन सुरू केलेली एक योजना / चळवळ नुकतीच वाचनात आली. पुण्यात राहाणाऱ्या आणि पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेबाबत काही चाड असणाऱ्या जबाबदार नागरिकांनी यात भाग घ्यावा म्हणून हे लिखाण. दुवा क्र. १ या संकेतस्थळावर जाऊन या मोहिमेचा भाग व्हा. मी नुकतेच या संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे.