विवाह, नोंदणी व आळंदी

कार्यालयातील विवाहानंतर जर नोंदणी केली असेल तरच तो विवाह कायदेशीर मानण्यात येतो. प्रेमात पडलेले अनेक जण घरातून पळून जाऊन आळंदी येथे विवाह करतात.  

या संदर्भात काही प्रश्नः
१. आळंदीला जाऊन विवाह केल्यानंतर त्याची नोंदणी बंधनकारक नसते का?
२. ज्यांना अखेर विवाहच करायचा आहे, ते सरळ नोंदणी कार्यालयात का जात नाहीत? 
३.प्रेमवीरांबाबत आळंदी येथेच जाऊन विवाह करण्याची 'परंपरा' का आहे?  महाराष्ट्रातील इतर धार्मिक स्थळांना विवाह होत नाहीत का? शहरातील इतर मंदिरांत विवाह होऊ शकत नाहीत का?