हलके चेंडू कुठे बनतात?

एका कारखान्यात
स्टीलचे चेंडू तयार होतात. तिथे असे चेंडू तयार करण्यासाठी   ७ यंत्रे
आहेत. पण, त्यातील एकच यंत्र कमी वजनाचे चेंडू तयार करते. सातही यंत्रातून
तयार होऊन येणारे सर्वच चेंडू दिसायला मात्र सारखे आहेत. तर ओळखणार कसं की
कोणते यंत्र हलके चेंडू बनवतेय? असे मानून चला की, तयार होणाऱ्या प्रत्येक
चेंडूचे आवश्यक वजन १० ग्रॅम आहे आणि हलका चेंडू ९ ग्रॅमचा माना. तुम्हाला
कोणत्याही प्रकारचा तराजू आणि कोणतीही वजने वापरण्याची परवानगी आहे.

आणि हो, हे एकाच वजनात शोधायचंय, बरं का!
ऑल
द बेस्ट.