आंबा तिरामिसू

  • २ आंबे किवा २ वाट्या आमरस+ सजावटीसाठी आंब्याच्या फोडी.
  • ५ ते ६ मोठे चमचे साखर
  • २ अंडी
  • १८ ते २० लॉफेल बिस्किटे( तिरामिसू करताची स्पेशल बिस्किटे) ही मिळाली नाहीत तर मेरी बिस्किटे घ्या आणि साखर वाटीभर घ्या.
  • लॉफेल बिस्किटात साखर असते त्यामुळे ५, ६ चमचे साखर पुरते.
  • फ्रूटी किवा ऑरेंज ज्यूस बिस्किटे भिजवण्यासाठी.
  • २५० ग्राम मस्कार्पोन चीज, ते नसेल तर लो फॅट क्वार्कचीज
३० मिनिटे
४ जणांसाठी

आंब्याचा रस काढून ब्लेंडरमधून घुसळून गुठळ्या मोडा. मस्कार्पोन चीज त्या मध्ये घालून एकत्र मिसळा. अंडी भरपूर फेटून घ्या. ती चीज आणि आंब्याच्या मिश्रणात मिसळा. लॉफेल बिस्किटे ट्रे मध्ये एकापुढे एक ठेवा, आणि त्यावर चमच्याने हळूहळू फ्रूटी/ऑरेंज ज्यूस घाला. बिस्किटे तो ज्यूस शोषून घेतील. आता ह्या लेअर वर आंबायुक्तचीजचा एक थर देऊन बिस्किटे झाकून टाका. पुन्हा बिस्किटांचा एक थर लावा, ज्यूस घाला व आंबायुक्त चीजने झाका. बिस्किटे- आंबाचीज- बिस्किटे- आंबाचीज असे एकूण चार थर होतील. आता आंब्याच्या फोडींनी सजवा.

फ्रिजमध्ये ६ ते ८ तास सेट करायला ठेवा. तिरामिसू थंड झाल्यावर घट्ट झालेले दिसेल.
हवा तेवढा पोर्शन डिशमध्ये थंडगार सर्व्ह करा.

 दुवा क्र. १  लो फॅट क्वार्कचीज

इटालीमधील सुप्रसिद्ध डेझर्ट, ह्याला आईस्क्रिमे मध्येही घालता येत नाही आणि केक मध्येही.. काहीतरी प्रकार    निवडल्याशिवाय पुढे जाता येत नसल्याने केक हा प्रकार निवडला आहे.

एक इटालियन मैत्रिण