पुन्हा आज झड ती पडे श्रावणाची
पुन्हा पेटली आग माझ्या मनाची ।ध्रु।
दिनी ह्या अशा आपली भेट घडली
न बागेत, सुमने मज मनी उमलली
ऋतू तोच पण योग तो मात्र नाही
सुरू मजसवे रूदने वर्षणाची ।१।
पुन्हा आज झड ती पडे श्रावणाची
कुणी हात हृदयी निमिषमात्र धरु दे
नि माझे हृदयखंड एकत्र धरु दे
परी सर्व हे खेळ स्वप्नी-मनीचे
तुटुन गोष्ट काही जुळे का कुणाची? ।२।
पुन्हा आज झड ती पडे श्रावणाची
टीपा :
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले
) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (लगागा लगागा लगागा लगागा) (भुजंगप्रयात ... मनाच्या श्लोकांचे वृत्त
)(मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे
शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...णाची किंवा ...नाची असे जमवा.