लाल चिखल आणि माज !!

बालभारतीच्या पुस्तकात एका धड्याचे नाव 'लाल चिखल' होते अनेक दिवसानी आज तो धडा आठवला.. त्यातला एक गरिब शेतकरी टॉमेटोला भाव मिळत नाही म्हणून त्या टॉमेटोवरच नाचतो.. आणि तुडवून त्याचा चिखल करतो... ! तो शेतकरी खरचं गरीब आणि असहाय्य दाखवला आहे..

आजच्या सकाळ मध्ये बातमी आली होती ती पाहून धडा आठवला पण त्याच बरोबर डोक्यात एक तिडिक पण गेली... बातमी वाचा-<दुवा क्र. १<
टॉमेटोचे ५ हजार क्रेट फेकले !!
 ह्यांना माज तरी कसला आलाय ??अगदी कमी भाव म्हणजे किती ?? फुकट पेक्षा नक्कीच बरं असणार ना ? !! त्याच बातमीत असे लिहिले आहे की गेल्या ६ महिन्यांत सर्वोच्य भाव म्हणजे ११६ कोटींची उलाढाल झाली आहे.... हे अस सगळं असताना ही फेका-फेकीची गल्थान व्रुत्ती कुठून आली ?
२ महिन्यांपुर्वी कोल्हापुरात म्हणे दुधाचा टँकर रस्त्यावर ओतून दिला होता... 

अरे ह्या ह. खो. लोकांना तेच दुध चाटून प्यायला लावले पाहिजे, किंवा तेच फेकलेले टॉमेटो उचलून त्याचे सुप पाजले पाहिजे महिनाभर !!

असल्या माजोरड्यांना कशाला हवीत शासनाची पॅकेजेस आणि कर्जमाफी विज माफी ??