आज कोणी प्रीतिने - मज मनोगत बोलले

आज कोणी प्रीतिने - मज मनोगत बोलले
टाकले मागे जगा... अन् ही पुढे मी चालले।ध्रु।

फोडुनी उर कातळाचा सळसळा उसळे झरा
वळण शतदा घेत झंझावात त्यात असे खरा
आज लाटांच्या उधाणी तीर वाहुन चालले ।१।
टाकले मागे जगा... अन् ही पुढे मी चालले

स्मित तया ओठात जेव्हा हाय विहरू लागले
तोहि थोडा भ्यायला अन् मीहि थोडी लाजले
बोलता काहीच ना सगळेच कोणी बोलले ।२।
टाकले मागे जगा... अन् ही पुढे मी चालले

टीपा :

पर्याय :

१. सर्व जग मागे पडे... अन् ही पुढे मी चालले
चाल देताना गालगागा गालगा ....
गागालगा गालगा असे तोडलेले असल्याने तेथे वेगवेगळे भाग करावे लागतात. तसे केलेले
नसते तर
टाकले जग सर्व मागे अन् पुढे मी चालले
असे भाषांतर करता आले
असते.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (गालगागा गालगागा गालगागा गालगा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )
(एक मुद्दा. ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीत एक गुरू अक्षर गाळले आहे. असे :
गालगागा गालगागा गालगागा गालगा
भाषांतरातही ते गाळलेले आहे  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... लले  असे जमवा. आणि ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीतले ते गाळलेले गुरू अक्षर गाळायला विसरू नका हां  प्रत्येक कडव्यानंतर जोडून ध्रुवपदातली दुसरी ओळ म्हटलेली आहे.