पाश्चिमात्य संगीत आणि भारतीय संगीत आणि आपली मानसिकता

आपल्यातील बहुतांश लोकांना पाश्चिमात्य संगीतापेक्षा भारतीय संगीत जास्ती आवडते ही वस्तुस्थिती (स्वाभाविक)आहे. 

पण मला स्वतः:ला मात्र हिंदी / मराठी गाण्यापेक्षा नवीन च उदयास आलेला "ट्रान्स"*   हा संगीत प्रकार खूप आवडतो. 
पण दुर्दैवानं माझ्या आतापर्यंतचा अनुभवावरून मला असे दिसून आले आहे की ह्या आवडीवरून बरेचदा अपमानित केले जाते किंवा कमी लेखले जाते.
त्या संगीतावर विविध प्रकारचे ताशेरे ओढले जातात. 
मला शास्त्रीय संगीतामधले "अजाबात" काही कळत नाही. पंडितजींचे जेव्हा गायन लागते तेव्हा त्यांचा मान ठेवून त्यांच्या गायनावर ताशारे ओढायचा आमच्या मनात विचार पण येत नाही. 
चर्चेसाठी विषय हा नाही की कोणते संगीत वरचढ किंवा अधिक दर्जेदार आहे. 
विषय असा आहे की
"ही" आपली मानसिकता च बनली आहे का ? जास्ती विचार न करता सर्रास ताशारे ओढून मोकळे व्हायचे, मग त्या व्यक्तीला उद्देशून असो किंवा त्या संगीत कलेला... ह्यामध्ये त्या संगीत कलेचा पण अपमान होण्याची शक्यता असते. 
एखाद्याला अशी आवड असणे हे चुकीचे आहे का ? आपली मानसिकता चुकीची आहे (किंवा एकदम १००% बरोबर आहे).
ह्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी. 

*(हा एक पाश्चिमात्य संगीत प्रकार आहे अधिक माहिती इथे पाहा दुवा क्र. १)