देशातले शिकारी खुर्चीस लक्ष्य केले
राज्यास हाकताना देशास भक्ष्य केले
निवडून येत असता सारे गरीब होते
कमवून वाममार्गे कित्येक लक्ष केले
पैसा अमाप मिळता एकी बरीच होती
स्वार्थास आच येता नवखेच पक्ष केले
झुंडीत लुटारुंच्या सारे मिळून खाती
दिसता कुणी इमानी त्याला विपक्ष केले
नारा असून एकी, गावास आखताना
दलितास मात्र वेशी बाहेर कक्ष केले
संदेश झाड लावा, त्यांनी जगास दिधला
पेरून बी विषारी, निर्माण वृक्ष केले
निवडून आज आले, नेते कसे नशीबी?
मारून देश त्याचे श्राध्दात पक्ष केले
"निशिकांत" जाणरे तू, भोळा समाज आहे
तू का तयास नाही वेळीच दक्ष केले?
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com