हे अश्रू असती बोल मन्मनाचे

हे अश्रू असती बोल मन्मनाचे
मी रडलो तर रडती अश्रू
मी
हसलो तर हसती अश्रू
हे अश्रू असती बोल मन्मनाचे ।ध्रु।

जणु उडली डोळ्यांतुन ठिणगी
अश्रू-अश्रूतून छबि तुझी
फाडुन माझे हृदय पहा तू
रक्तातुन वाहे प्रीति तुझी
हे तांडव चाले जणू जीवनाचे ।१।

सवे चाललिस नकोस वळु तू
जन्मसखी गं जन्मपथावर
मज कळवळता सोडून ना जा
दुःखवेदनेच्या फाट्यावर
हे गीत असे मम दुःखज्ञापनाचे ।२।

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   
(ध्रुवपद : गा गागागागा गागागागा गा आणि कडवी : गागागागा गागागागा)
(मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...   नाचे  असे जमवा बरका!  यमकाची जागा ठळक केलेली आहे.