जे जे प्रीती करती - ते करती थाटाने

जे जे प्रीती करती - ते करती थाटाने
ते जगती थाटाने - ते मरती  थाटाने ।ध्रु।

घेतात कुणाचे ना - त्यांना हे लक्ष प्रणा
नसती कुठेच थबकत
नाहीत कधीच झुकत
                काही होवो परिणा
प्रियसखिच्या मार्गीं ते- संचरती  थाटाने ।१।
ते जगती थाटाने - ते मरती  थाटाने

सोपे नाही सगळे - जग सदैव पडताळे
भिनते थेट काळजीं
पडते फार काळजी
                किति उठतात वादळे
बुडल्यावरही येती - ते वरती  थाटाने ।२।
ते जगती थाटाने - ते मरती  थाटाने

टीपाः

मूळ गाण्यापेक्षा भाषांतराच्या ओळी छोट्या निवडून भाषांतर अधिक आव्हानात्मक झालेले आहे.

१. पर्याय :
प्रियसखिच्या मार्गावर - ते फिरती गागागा

२. अर्थ
काळजीं = काळजामध्ये ! ह्या दोन्ही ओळीत शब्दचमत्कृती आणि यमक हे दोन्ही मूळ गाण्याप्रमाणे साधण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.

३. पर्याय
बुडल्यानंतरहि परी - ते तरती गागागा
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : भाषांतर मूळ गाण्याच्या चालीत नाही. भाषांतराची चाल :

गा गागागागा गा ... असे अनेक तुकडे

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...   अरती गागागा असे जमवा बरका. यमकाची जागा ठळक केलेली आहेच