आयुष्य राजयोगी, उपभेगता न आले
माझे असून "माझे"संबोधता न आले
आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले
जखमा संख्य होत्या अन वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
सोडून दूर सुख मी, दुःखात चूर झाले
दुःखातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले
जयश्री अंबासकर