आधी कुणी?

ओठावरी प्रतिसाद होता
'आधी कुणी?' हा वाद होता

जडला कसा तो कोण जाणे
भेटायचा जो नाद होता

माझेच घर विसरुन गेलो
पत्ता तिचा पण याद होता

शोधायचे तर रात्र जाई
मोठा तिचा प्रासाद होता

श्वासात होती मूळ कविता
गात्रांमधे अनुवाद होता

ओठात माझ्या गझल होती
ओठी तिच्या 'इर्शाद' होता

------ जयन्ता५२