दत्त्तक घेणे कितपत योग्य ???..

प्रिय, मनोगती...
आज मी तुमच्या कडून एक सल्ला मागत आहे. ही सत्य घटना आहे.
मीना एक मध्यमवर्गीय घरातली. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आई वडिलांनी अगदी थाटामाटात लग्न लावून दिले. ज्या घरी दिले ते घर ही चांगले, मोठं कुटुंब . आई कडे ही हे पाच भावंडे त्यामुळे ती या मोठ्या कुटुंबात लगेच मिसळली, सासर घरचे चांगले होते. घरातील मोठे दीर बँकेत मोठ्या पदावर, दोन नंबरचा दीर इंजिनियर आणि हिचा नवरा बँकेत कॅशियर , त्यामुळे घर हे नेहमी आनंदात असायचे. सगळे छान राहत त्यात मोठ्या दिराला ३ मुले . दोन नंबर वाल्याला २ मुले असं हीच मोठं कुटुंब . त्यात इंजिनियर दीर पुण्यात स्थायिक झालेला त्यामुळे हे दोघे भाऊच गावात राहत असे.
 अचानक घराला दृष्ट लागावी अशी एक घटना घटली हिच्या लग्नाच्या ३ वर्षानंतर  मोठ्या दिराला   मुळ्वेध ची समस्या उद्भवली आणि त्यांतच त्यातच ते वारले . त्यामुळे घरात एक प्रकारची शोककळा पसरली. नवीन बंगला बांधलेला होता त्याच्यावरील लोन कमीत कमी २.५० लाख रुपये होते. सगळा बाहेरचे उद्योग मोठे दीर सांभाळत होते. त्यामुळे घराची जबाबदारी रमेश (मीना चा नवरा) ह्याच्यावर आली. त्या वेळेस रमेश ने ही नोकरी सोडली होती   त्यांमुळे तो पण बेकार होता, भावाच्या नंतर त्याच्यावर घराची जबाबदारी आली. भावाच्या बँकेतून ऑफर आली की भावाच्या जागेवर रुजू व्हावे पण त्या वेळेस मोठी वाहिनी म्हणाली मी घरात राहून काय करू ? तर मी त्यांच्या जागेवर रुजू होणार, घरच्यांनी तिला परवानगी दिली. मग मीनाच्या सासऱ्यांनी विचार केला की , जर मी रमेश ला आणि मीना ला पुण्यात नोकरी साठी पाठविले तर मोठी ला थोडा आधार होईल. त्यामुळे हे दोघे पुण्यात येऊन दोन नंबरच्या घरात राहू लागले. त्याच्या बायकोला ते आवडले  नाही  .     त्यामुळे तिने त्या दोघांबरोबर भांडण करून त्यांना घरातून काढून टाकले. हे दोघे जिथे नोकरी करत होते तिथल्या काही लोकांनी त्यांना रूम बघून दिली. आणि ते दोघे तिथे शिफ्ट झाले .
आणी गावाकडे मोठीच्या मनात आले की ह्या दोघांनी स्वतःचा संसार आता वेगळा मांडला म्हणजे सासू सासऱ्यांची जबाबदारी आता माझ्यावर आली म्हणून तिने   सासू सासऱ्याची      भांडण करून मुलांना घेऊन माहेरी गेली. तिकडे जाऊन तिने नोकरी सोडून बांगड्यांचा व्यवसाय चालू केला. तेव्हा ह्याच्या लग्नाला ५ वर्ष पूर्णं झाली होती. घराची लोण ची जबाबदारी आता कमी झाली होती.आता यांना पण वाटत होते की ह्याच्या घरात पण एक छोटंसं बाळ यावं पण नियतीच्या काही वेगळं चं मनात होते, किती तरी प्रयत्न करून झाले डॉक्टर झाले , बुवाबाजी झाले तरी काही परिणाम झाला नाही शेवटी मीना व रमेश नि ठरवले की आपण एक मूल दत्तक घेऊया अशा विचार चं केला की परत नियतीने तिचा खेळ दाखवला मीनाची मोठी जाऊबाईनं थायरॉईड होत त्याच्याकडे त्यांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे त्या पण दगावल्या. आता परत मीना व रमेश ह्यांना   सासू सासऱ्याची     तिची ती ३ मुलांचा सांभाळ करावा अस सांगितले त्यांनी पण त्या ३ मुलांची जबाबदारी घेतली. आज ती मुले एक १२ वी ला आहे, एक इंजिनिअरिंग करत आहे आणि एक ८ वी आहे, मुलगी आता १२ वी ला आहे. पण अजून ही मीना ला मुलं झाले नाही आज तीच्या लग्नाला १० वर्ष पूर्णं झाली आहेत. आता त्या दोघांनी पुन्हा दत्तक घ्यायचं विचार केला आहे. तीच्या   सासऱ्यांनी त्या साठी परवानगी दिली आहे पण सासू बाईंना ते योग्य वाटत नाही हे. पण मीना आणि रमेश ला वाटतंय की त्यांना पण आई वडील म्हणणार कोणी तरी हवंय?
मनोगती आपण कृपया करून याच्यावर तुमचा निर्णय पाठवा. ती जे हे कर ते आहे ते योग्य आहे की नाही?