ओदिशा
- ओदिशा - १ : पूर्वरंग
- ओदिशा - २ : रेलवे, रायपूर आणि ओरिसा
- ओदिशा - ३ : नृसिंहनाथ आणि हरिशंकर
- ओदिशा - ४ : झुकलेले शिवमंदिर आणि हिराकूड धरण
- ओदिशा - ५ : भुवनेश्वर परिसरातील मंदिरे
- ओदिशा - ६ : पिपली आणि कोणार्क
- ओदिशा - ७ : जगन्नाथपुरी
- ओदिशा - ८: चिल्का सरोवर
- ओदिशा - ९ अंतिम: भुवनेश्वरची दोन वस्तुसंग्रहालये
आता पाहायचे होते राज्य वस्तुसंग्रहालय अर्थात स्टेट म्यूझियम. जातांना रिक्षाने जाऊन येतांना बसने यायचे असे ठरले. रिक्षा भुवनेश्वरच्या अतिशय देखण्या राखलेल्या भागातून जायला लागली. मुंबईतल्या म्यूझियमसभोवतालच्या प्रदेशातले रस्ते किंचित अरुंद केले तर कसे वाटेल तसे. पण मुंबईच्या मानाने झाडे भरपूर. ती देखील चांगली निगा राखलेली.
संग्रहालयाला प्रशस्त, विस्तीर्ण आवार. राजभवन, टी आय एफ आर वगैरे मोजकी स्थळे वगळता मुंबईत एवढे विस्तीर्ण आवार कुठेच नाही. आवारात विविध आकारांच्या चौकटीत सीमित केलेली, सुरेख राखलेली हिरवळ आणि व्यवस्थित कातरलेली झाडे.
भुवनेश्वरमध्ये आतापर्यंत दिसलेली घाण बकालपणा याचा मागमूस कुठे नाही. वाटले नंदनवनातच आलो.
अधूनमधून आकर्षक शिल्पे आणि पुतळे.
ही सर्वव्यापी श्रीकृष्ण, बालभद्र आणि सुभद्रा यांची त्रिमूर्ती आणि त्यांचे ते ओदिशी शैलीतले वैशिष्ट्यपूर्ण टप्पोरे डोळे.

प्रकाशचित्रणाला प्रतिबंध नसल्यामुळे चंगळच झाली
संग्रहालयाच्या आतल्या खिडकीतून दिसणारी संग्रहालयाची नीटनेटकी इमारत
ओदिशातील विविध आदिवासी जमातींच्या जीवनशैलीचे दर्शन घडवून माहिती देणारी काचघरे होती.
कारंज्याने सजीव केलेले वातावरण
आता दुसरे संग्रहालय. रीजनल म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी. पहिले संग्रहालय जास्त चांगले की आताचे असा प्रश्न पडावा.
थोडाफार सोनटक्क्यासारखा दिसणारा पण जास्त मोठा आणि जास्त मोहक हेलिकोनिया.हिरवळ, सुंदर झाडे, शिल्पे वगैरेंच्या जोडीला टेनिस चेंडूएवढ्या मोठ्या आकाराचे मोठ्ठे झेंडू ठिकठिकाणी फुललेले. झुळझुळणार्या वार्याने त्या सजीव वातावरण उत्साह भरला.
इथे देखील प्रकाशचित्रांची चंगळ
प्रवेश केल्याबरोबर समोर हत्तीचा हाडांचा सापळा ठेवला आहे.
पुढील युगुलातला मी कोणता ते ओळखा पाहू
टिप्पणीची गरज आहे?
पुन्हा देखण्या आवारात
दिवस मस्त गेला. परत येणे तसे सोपेच होते. पण बसला गर्दी असल्यामुळे रिक्शा केली. थोडा वेळ आराम करून, स्नान करून जेवायला निघालो. दुपारी न जेवल्यामुळे जोरदार भूक लागली होती. आज ताजी मिठाई मिळाली. तीच मावा स्टफ्ड मावा केक म्हणावी अशी. ती डिस्कव्हरीवर दाखवलेली बहुधा छेना की मिठाई म्हणतात ती हीच असावी.
आता परतीचे वेध लागले होते. मनाशी गोळाबेरीज होऊ लागली. हुमा वगळता सारी ठिकाणे सुंदर होती. सुरुवात परीक्षा घेणारी झाली तरी दौरा सार्थकी लागला होता. आठवडा कसा गेला हे कळलेही नव्हते. राहायच्या हॉटेलसमोरच भुवनेश्वर स्थानक होते. त्यामुळे कोणार्क मुंबई गाडी फलाटावर लागल्याशिवाय सामान बाहेर काढायचे नाही असे ठरले. बहुतेक खरेदी पिपलीलाच झाली होती. आता उद्या २४ तारखेला दुपारी निघेपर्यंत आरामच आराम.
२४-११-२०११.
बाळीला पुन्हा एकदा लिंगराज मंदीर पाहायचे होते. तेही तिने पाहून घेतले. फार थकायला झाले असल्यास रेलवेची तिकिटे रद्द करून विमानाने मुंबईला यायचे ठरले होते. पण तसा थकवा आलाच नव्हता. त्यामुळे रेलवेच पसंत करून पैसे वाचवले. ओरिसा तसे मुंबईपुण्याच्या मानाने बरेच स्वस्त आहे. त्यातून आम्ही स्थाकनजीकत्त्व साधायला बकाल परिसरात साधारण हॉटेलात राहिलो. त्यामुळे नियोजित अंदाजपत्रकाच्या ४० टक्केच खर्च आला. दौर्याच्या मधुर आठवणी जागवीत गप्पा हाणत मजामस्ती करीत पुणे कधी आले ते कळलेही नाही. ओदिशातली भटकंती अशा तर्हेने सुफळ अंपूर्ण झाली.
माझी लिखित वटवट खपवून घेतल्याबद्दल सर्व वाचकांचे अगोदरच आभार मानतो.
संपूर्ण.