आज

चेहऱ्यांनी तंग केले
आरसे संपात गेले

ती जुनी चालेल मदिरा
आण नक्षीदार पेले

एक बापू आणि बाकी
फक्त नावाचेच चेले

फारसे नुकसान नाही
तीस का चाळीस मेले

आज आले परतुनी ते
कालपरवा काढलेले

काल राजा आज त्याला
गाढवावरतून नेले

ते हुतात्मे ते महात्मे
वाटते हकनाक मेले

---- जयन्ता५२