अति आदरणीयता Politacally Correct लिहिणे

खर सांगायचं तर मला नावामागे आदरार्थ "जी" हा प्रत्यय लावलेला आवडत नाही.  इथे या संकेतस्थळावर हे असे लिहिणे कृत्रिम नाही का वाटत?

मी सरळ सरळ मराठीबाण्याचा तसेच पक्का पुणेरी असल्यामुळे जर कोणी मला "जी" लावून संबोधिले, तर ते दुसर्‍याकोणाला ते उद्देशून असेल या हिशोबाने बहुधा दुर्लक्ष करण्याचीच शक्यता आहे.

माझ्यामते "जी" हा प्रत्यय हा पहिल्यांदा नागपुरी लोकांवर झालेल्या हिंदीच्या प्रादुर्भावामुळे या वर्‍हाडी माणसांनी मराठीमध्ये आणला. अगदी लहान असताना वर्तमानपत्रांत "लोकनायक आण्णासाहेब अणेजी" असे वाचल्याचे मला आठवते, आणि त्याची गम्मतपण वाटे.  बापरे किती उपाधी या आण्णासाहेबांना !!


हाच "जी" प्रत्यय पुढे राष्ट्रीय स्वयंसेवकांकडून नियमीत वापरलेला आढळला (पुन्हा विदर्भाचा प्रभाव?) उदा. "नानाजी देशमुख, माधवरावजी गोळवलकर" वगैरे.


मग सुरू झाले काँग्रेसी लांगूलचालन:
पंडितजी;  इंदिराजी; आणि आता सोनियाजी !!


कुठे गेली ती राकट कणखर मराठी भाषा?


याविरुद्ध इकडे अमेरिकेत- बिल क्लिंटन, आल गोअर, डिक चेनी, काँडी राईस, अशा सुटसुटित बोली भाषेत नेत्यांना पुकारले जाते!


प्रशासकजी आपले काय मत आहे?


कलोअ,
परभारतीय