माध्यमिक मनोगती

अनेकानेक मनोगतींचे मनोगतावर प्रकाशित झालेले लिखाण प्रसिद्धीमाध्यमांतही प्रकाशित होत आहे. येथे अशा मनोगतींच्या 'माध्यमिक' कामगिरीचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.


आतापावेतो सुवर्णमयी, सुभाषचंद्र आपटे, प्रसाद, मृदुला, विकु, प्रवासी, चित्त, नीलहंस, अदिती, तुषार जोशी इत्यादींचे लेखन अशाप्रकारे प्रकाशित झालेले आहे असे कळते.


इतरांचेही लेखन प्रसिद्ध झालेले असेल किंवा होईल त्याविषयी माहिती दिलीत तर ती येथे सारणीच्या स्वरूपात ठेवता येईल, आणि इतर सदस्यांना ती प्रोत्साहनपर होईल ह्याची खात्री वाटते.


ह्यासाठी सदस्याचे मनोगतावरील नाव, माध्यमातील नाव, मनोगतावरील लेखनाचा दुवा, त्या माध्यमातील लेखनाचा दुवा इत्यादी तपशील खाली प्रतिसादाच्या स्वरूपात द्यावा ही विनंती.