पतंग माझियाकडे पहात हळहळायचे,
"अरे अम्हा कधी असे उडायला मिळायचे?"
कितीकदा निघायचो तिच्याकडेच जायला
हिच्याकडेच पाय नेमके कसे वळायचे?
अजाणती अशी कुणी वधू मला मिळेल का?
कशास रोज तांबड्या दिव्याकडे वळायचे?
म्हणून मी बुजू दिले न भोक छप्परातले
नळाविनाच नीर पावसातले मिळायचे
हिच्या मिठीमधे मला कसेकसेच व्हायचे
मधूस भेटताच सर्व चंद्र मावळायचे
"तशी पुन्हा कुणी कधी इथे न झोप घेतली!"
विवाहबंधनात मी!! पलंग तळमळायचे!!!
कधी कधी घरामधे पिशाच्च भूत यायचे
हिलाच भेटण्यास ते मला कसे कळायचे?
कबूल मी तसा तुझा जुनाच काफिया तरी
नवीन वृत्त वापरून का मला छळायचे?
विडंबने करीत का इतस्ततः फिरायचे?
जगास त्रास द्यायचा, स्वतःसही छळायचे
माफी
चित्त ह्यांच्या वसंत माझियाकडे पहात हळहळायचे वर आधारित