(स्थलांतर)

रस्ते... घरे... दुकाने... पडलीच ओस आता...
शोधावयास श्रोते, चल कोस कोस आता...


अंडी फळे टमाटू घेऊन लोक आले
पळ तू उपाय हेही करतील ठोस आता!


निष्पाप गाढवेही जाती स्थलांतराला
हा काव्यगायनाचा तू सोड सोस आता...


ज्यांच्याकडून तेंव्हा मज वाहवा मिळाली
करती यथेच्छ निंदा का राजरोस आता?


जातो जुना गबाळा, येतो नवा शहाणा
ही रीत या जगाची विसरू नकोस आता...


- माफी, मनोगत


कुमार जावडेकर ह्यांच्या स्थलांतर वर आधारित