सोनुचे अजब जग

नदिच्या  काठावर तायडिच्या बाजुला नुसतं बसुन बसुन सोनु अगदी कन्टाळुन गेली होती.तायडी तर मस्त पुस्तक वाचनात मग्न होवुन गेली होती .तसा एकदोनदा सोनुने तायडिच्या पुस्तकात डोकावायचा प्रयत्न केला पण चित्रे नसलेलि पुस्तके वाचण्यात काय मजा? बसल्या बसल्या फ़ुले गोळा करुन हार गुम्फ़ुया असे तिने ठरविले.  भर दुपारी एवढे कष्ट घ्यावेत का असा विचार करतानाच लाललाल डोळ्यांचे एक गोरेपान ससोबा तिला दिसले. आता ससा दिसणे ही काही तिच्या द्रुष्टिने नवलाईची गोष्ट नव्हती; अगदी ते ससोबा पळता पळता 'अरे बापरे मला उशिर झाला वाटत ' असे म्हणत होते तरी तिला काही वेगळे वाटले नाही (नंतर मात्र ससा कसा बोलला हे आठवुन तिला फारच गम्मत वाटली. पण तेव्हा मात्र सगळे बरोबर वाटत होते.)जेव्हा ससोबांनी पळायचे सोडुन ,थांबुन, कोटाच्या खिशातुन घड्याळ काढुन बघितले तेव्हा मात्र ही काही वेगळीच भानगड दिसते हे तिच्या लक्षात आले.तो पर्यन्त घड्याळ ,घड्याळच कशाला कोट घालणारा ससा तरी तिने कुठे पाहिला होता ? हा प्रकार काही वेगळाच दिसतोय असे म्हणून  ती ससोबांच्या  मागे धाऊ लागली .आणि ससोबा एका बिळात गुडुप होताच सोनुही मागचा पुढचा विचार न करता त्या बिळात शिरली.