सांगावसं वाटलं म्हणून...

काही चर्चा वाचून असं निदर्शनास आलं की, काहीतरी प्रक्षोभक विषयावर पिंक टाकल्यासारखा चर्चेचा प्रस्ताव सुरू केला जातो. आणि त्यावर प्रतिसादही येतात...


हे काही बरोबर नाही.


अर्थात सर्वच चर्चा अशा असतात असे नाही. पण जे २-३ अपवाद असतील ते खटकतात.


विषय काय असावा यावर आक्षेप नाही. पण चर्चा सुरू करण्याअगोदर थोडी तयारी करणे अपेक्षित आहे. जसे आपण चार लोकांसमोर भाषण करायचे म्हणून करू, तशी तयारी करावी. केवळ 'असं वाटतं' म्हणून चार ओळींचा चर्चेचा प्रस्ताव मांडू नये. जर केवळ माहिती घेणे हा हेतू असेल तर तसे स्पष्ट नमूद करावे. विवादास्पद मत मांडताना गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण तसेच शक्यतो दाखले द्यावेत.


यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोप न होता, सखोल चर्चा शक्य होईल व अभ्यासपूर्ण चर्चा वाचून जास्त आनंद मिळेल.


यात कोणावर वैयक्तिक टीकेचा हेतू नसून, 'मनोगत'चा दर्जा कायम राहावा हाच प्रामाणिक हेतू आहे.


अर्थात, यावरही आपली मते अपेक्षित आहेत.


 


व्यक्तीगत टीका नको म्हणून चर्चांचा संदर्भ जाणीवपूर्वक टाळला आहे.


चुकभुल द्यावी घ्यावी.