क्रिएटिविटीच्या भुता





क्रिएटिविटीच्या भुता*

अचानक अंगात येऊन

येता जाता मारत असतोस ....

प्रतिभेचे खडे!

खडा लागताच सगळे शहारतात

बैलासारखे!


सारखा खरडतोस

लेख, कविता, गझला

पाणचट, गुळमुळीत

नाटकी, बालिश


वाचणाऱ्यांच्या अंगात शिरून

देतोस प्रतिसाद,

'वावा!' 'क्या बात है!'

कारण ...

त्यांच्यासाठीही जमवायचे असतात

प्रतिसाद!


क्रिएटिविटीच्या भुता

तू मारलेले खडे जमून

आता एक मोठा दगड बनलाय
पुन्हा मारशील खडा

तर याद राख!

तो दगड बसेल तुझ्या छातीवर
भुतासारखा !!!







* "क्रिएटिविटीचे भूत" ही संकल्पना माझी नाही, पण मला आवडली. ह्या संकल्पनेचे सौजन्य "असंच खरडलेलं".

या भुताचा इतर कोणत्याही भुताशी थेट संबंध नाही. सर्वांनी हलकेच घ्यावे ही विनंती.